Press "Enter" to skip to content

पाताळगंगा नदीच्या जोड नाल्यातून भेकराची सुटका

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷

भटक्या कुञ्याच्या  दहशतीने नदिपाञातून नाल्यात गेलेल्या भेकराची प्राणी मिञ हनीफ कर्जीकर यानी सुटका करित जीवदान दिल्याची घटना हाळ आदिवासीवाङी नजीक घङली.शुक्रवारी तालुक्यातील हाळ आदिवासी वाङीलगत नाल्याच्या प्रवाहात हरिण सदृश्य प्राणी असल्याची माहिती हनीफ कर्जीकर याना मिळाली.त्यानी तातङीने धाव घेतली.भेकर असल्याचे लक्षात आल्यानंतर बाहेर काढण्यात आल.भेकर जखमी अवस्थेत असल्याने तातङीने खालापूर येथील पशुवैद्यकिय रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

वनविभागाच्या अधिका-याना माहिती देण्यात आली असून पुढील कारवाई अधिकारी करित असल्याचे अपघातग्रस्त मदत पथकाचे गुरूनाथ साठेलकर यानी सांगितले.

भेकरला उपचारासाठी नेताना प्राणी मिञ हनीफ कर्जीकर.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.