सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶
उरण-पनवेलच्या न्यायहक्कासाठी सातत्याने लढा उभारुन न्याय मिळविणारे अजित म्हात्रे यांनी राष्ट्रीय महामार्गाची दास्तानफाट्याला क्रॉसिंग मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. तशा प्रकारचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले आहे.
सदर राष्ट्रीय महामार्ग हा दास्तानफाट्यावरून (एलिव्हटेड) उपरी मार्गाने ८ ते ९ मीटर उंचीने जाणार असल्यामुळे दास्तानफाटा येथे कोणतीही क्रॉसिंग देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेजारील गाव बेलपाडा, चिर्ले येथील जनतेला उरणला व पनवेलला जाण्याकरिता दीड ते दोन किमी लांबीचा पल्ला गाठून क्रॉसिंग करायला लागेल. यामुळे वयोवृद्ध व दिव्यांग लोकांना याचा खूप मोठा त्रास होण्याची शक्यता आहे .
सदर जो राष्ट्रीय महामार्गावर दास्तानफाट्यावरुन जाणार आहे त्याला दास्तानफाट्यावर क्रॉसिंग मिळण्याकरीता झोपलेल्या शासनाला व राष्ट्रीय महामार्गाचे सक्षम अधिकारी आहेत. या सर्वांना जागे करण्याकरीता समाजसेवक अजित म्हात्रे यांनी दिनांक २१ सप्टेंबर रोजी दास्तानफाट्यावर पुन्हा एकदा शासनाचे विरोधात आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.







Be First to Comment