Press "Enter" to skip to content

रायगडातील टोल चा झोल बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विश्वतेज साळवी यांचा इशारा 🔷🔶🔷🔶

पालीत वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक 🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🌟💠🌟💠

रायगड जिल्ह्यामध्ये टोलनाक्यावर जनतेची होणारी लुट थांबविण्याकरिता वंचित बहुजन आघाडीने आक्रमक होत आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील टोलचा झोल लवकरात लवकर न थांबविल्यास रायगड मधील टोल नाके बंद करणार असल्याचा इशारा वंचित  रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी यांनी पाली येथे दि.(11) शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिला.

सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड यांचे निवासस्थानी रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारणीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर होणाऱ्या लुटीचा लेखाजोखा मांडला. यावेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर असलेल्या मुख्य टोलवर 103 रुपये इतका टोल पूर्वी आकारला जात होता तो अचानक वाढवून दोनशे रुपये केल्याने जनतेच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. तसेच शेेेेरंंडुग येथे असलेल्या टोल नाक्यावर सोयीसुविधांचा अभाव असून रस्तादेखील खड्डेमय आहे. असे असताना देखील तेथे सक्तीचे  व दादागिरी करून टोल आकारला जातो.  तर अनेक टोल नाके हे कालावधी संपला असून देखील सुरू आहेत. अशी माहितीवजा तक्रार सर्व कार्यकर्त्यांनी वंचितचे जिल्हा अध्यक्ष साळवी यांच्याकडे मांडली.

यावर प्रतिक्रिया देताना रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी यांनी सांगितले की , संपूर्ण जगात व भारतात कोरोना  रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मागील पाच महिन्या पासुुन अर्थचक्र पूर्णतः कोलमडले आहे. जनतेच्या हाताला काहीच काम नाही. लोकांची अक्षरश फरफट झाली आहे. लोकांसमोर जीवन मरणाचा प्रश्न उभा आहे. अशा परिस्थितीत हे सरकार टोल नाके लावून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे. आमचे नेते श्रध्येय ऍड: बाळासाहेब आंबेडकर हे जनहिताच्या विविध समस्या व प्रश्नावर लढे आंदोलने उभारून त्यांना न्याय मिळवून देत आहेत.

त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही या सरकारला आवाहन करणार आहोत की आपण टोलवरील अतिरिक्त वसुली थांबवा, नियमबाह्य टोल नाके बंद करा अथवा जोपर्यत कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णतः टळत नाही तोपर्यंत टोल नाके बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी सबंध रायगड भर टोल विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष साळवी यांनी सुधागड पाली येथे झालेल्या बैठकीत दिला.

या बैठकीला रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेेज  साळवी , महासचिव सागर भालेराव, सुधागड तालुका अध्यक्ष अमित  गायकवाड, संदीप गाडे खालापूर तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे , किरण मोरे, स्वप्नील गायकवाड ,नारायण जाधव, आनंद जाधव, संजय घाग, विशाल मातोळे, प्रशांत जाधव, सिद्धार्थ सोनवणे, सारथी महामुंकर, प्रदीप वसंत ढोले  लोकेश चंद्र यादव, सुनील देऊ गायकवाड, गणेश बनसोडे, आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.