सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔷🔶
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड व रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, उरण विधानसभा अध्यक्ष रोहित घरत यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुका युवक काँग्रेसच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन न पाळल्यामुळे युवक काँग्रेसच्या माध्यमातून खालापूर तहसील कार्यालयाला युवा नेते अक्षय मुंढे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

खालापूर तहसील कार्यालया बाहेर युवक काँग्रेस च्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्याठिकाणी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत गायकवाड, रायगड जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सागर सुखदरे, युवा नेते अक्षय मुंढे ,रायगड जिल्हा युवक काँग्रेस सचिव प्रशांत खाने, खालापूर तालुका NSUI अध्यक्ष कुणाल जाधव, खालापूर तालुका NSUI कार्याध्यक्ष शायान उस्मानी, रसायनी NSUI अध्यक्ष दिवेश पाटील उपस्थित होते.






Be First to Comment