सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) 🔶🔷🔶🔷
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 843 उरण -बौद्धवाडीचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी मागासवर्गिय सेल रायगड जिल्हा उपाध्यक्ष ,बौद्ध समाजातील ऍक्टिव्ह कार्यकर्ते, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे प्रकाश धर्मा कांबळे यांचा 60 वा वाढदिवस भीमशक्ती सामाजिक संघटना उरण, भारतीय जनता पार्टी मागासवर्गीय रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मित्रमंडळी यांच्यासोबत अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आला.
कोरोना असल्यामुळे शासनाच्या आदेशाचे पालन करत कुठेही न जाता घरीच वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प समाजसेवक प्रकाश कांबळे व त्यांच्या मित्र मंडळींनी केला. वाढदिवसानिमित्त प्रकाश कांबळे यांनी गरजू व गोरगरिबांना धान्य वाटप केले.
सुनील गायकवाड(बहुजन समाज पार्टी अध्यक्ष), विजय पवार(बौद्धजन पंचायत समिती उरण सचिव), महेंद्र साळवी, रोशन गाडे, संजय पवार, आखलेश जाधव, गौरव गायकवाड, आनंद जाधव, विनोद कांबळे, हर्षद कांबळे, अमर गायकवाड, नागेश कांबळे, जयेश पाटील, सूरज शर्मा, साहिल जोशी, अक्षय कांबळे, साहिल गायकवाड, शिवाजी म्हात्रे, परशुराम मसन, संतोष म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, शिवाजी ठाकूर, भाई शिवाजी ठाकूर, गोविंद पाटील, दिलीप ठाकूर, सरकार समुदे, पत्रकार विठ्ठल ममताबादे आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.






Be First to Comment