सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🔶🔷🔷🔶
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय उत्तम सेवा दिली असून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा केली. डॉ. चेतन म्हात्रे यांनी प्रत्येक रुग्णाच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला देऊन पुढील कार्यवाहीसाठी आपल्या परीने मदत केली. त्यामुळे नागोठणे परिसरात या तरुण होतकरु डॉक्टरचे सर्वत्र कौतुकच होत आहे.
२४ वर्षाचा तरुण डॉक्टर नागोठणेकरांना लाभला हे नागोठणेकरांचे भाग्य आहे. डॉ. चेतन म्हात्रे हे प्रामाणिक व स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. ते नोकरी करत आहेत ते समाज सेवेसाठी. आमदार रविशेठ पाटील हे नात्याने त्यांचे आजोबा लागतात परंतु आपले कर्तव्य बजावत असताना ते कधीही आमदार रविशेठ पाटील व त्यांचे नाते या संबंधित चर्चा करीत नाहीत. त्यांचे आई वडील हे पोलिस सेवेत आहेत त्यामुळे त्यांना समाज सेवेची आवाड निर्माण झाली. भारतीय सैन्य दलात सेवा बजावण्याचे त्यांचे स्वप्न होते परंतु काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बी.ए. एम. एस पदवी संपादन करुन ते डाॅक्टर झाले व नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीला लागले.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक गरीब रुग्ण येतात त्यांना तपासून काही औषधें ते लिहुन देतात. रुग्णाला शक्यतो बाहेरून औषधे घ्यावी लागू नये याकडेच त्यांचा कल असतो. परंतु एखादे औषध जर आरोग्य केंद्रात उपलब्ध नसेल तर स्वतःच्या खिशातून पैसे देऊन त्या गरीब रुग्णाला औषध घेऊन देतात. अशा होतकरू समाजसेवी डॉक्टरला काही समाजकंटक नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करतात व त्यांच्या शासकीय कामात व्यत्यय आणतात हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.






Be First to Comment