रॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होणार : केंद्र सरकारचे आदेश
सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली 🔷🔶🔷🔶
रॅपिड अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना रॅपिड अँटीजेन टेस्ट चे सर्व लक्षणे दिसणाऱ्य़ा परंतू रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांची पुन्हा चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. देशातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सरकारही घाबरले असून या संशयित रुग्णांची आरटी-पीसीआर केली जाणार आहे.
या दुबार चाचणीसाठी केंद्राने जिल्हा आणि राज्य पातळीवर एक अधिकारी किंवा टीम नियुक्त करण्यास सांगितले आहे.ही टीम जिल्हावार किंवा राज्यातील दररोज रॅपिड अँटीजेन टेस्टच्या रिपोर्टचे परिक्षण करणार आहे. हे अशासाठी करण्यात येणार आहे कारण कोरोनाचे लक्षण असलेल्या सर्व रुग्णांच्या निगेटिव्ह प्रकरणांच्या तपासणीत उशिर होऊ नये. या टेस्टमधून एखादा जरी पॉझिटिव्ह रुग्ण सुटला तरीही रुग्णसंख्या वाढण्याची भीती सतावत आहे.
मंत्रालयानुसार काही मोठ्या राज्यांमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आलेल्या लोकांची आरटी-पीसीआर टेस्ट केली जात नाहीय. आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या सुचनांनुसार सर्व कोरोना लक्षणे दिसणाऱ्या (ताप, खोकला किंवा श्वास घेताना त्रास) रुग्णांची रॅपीड टेस्ट निगेटिव्ह आली आहे त्यांची पुन्हा आरएटी-पीसीआर टेस्ट केली जावी, असे म्हटलेले आहे. राज्यांनी संभाव्य कोरोना बाधित रुग्ण जाऊ नये याची काळजी घेतलीच पाहिजे असे म्हटले आहे.
रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि आरएटी-पीसीआर टेस्टमध्ये कोरोना व्हायरसची तपासणी केली जाते. यामध्ये नाक आणि घशातील स्वॅबचे नमुने घेतले जातात. अँटीजेन टेस्टचा रिझल्ट येण्यास 20 मिनिटे लागतात. तर आरटी- पीसीआर टेस्टचा रिझल्ट 3 ते 4 तासांत येतो. अँटीजेन टेस्टमध्ये जर रुग्ण कोरोना बाधित आढळला तर त्याची विश्वसनियता ही 100 टक्के असते. मात्र, निगेटिव्ह टेस्टमध्ये हीच विश्वसनियता 30 ते 40 टक्के एवढीच आहे. म्हणजेच अनेक रुग्ण आधी निगेटिव्ह येऊन नंतर पॉझिटिव्ह होत आहेत. यामुळे रॅपीड टेस्ट निगेटिव्ह आल्यास आरटी-पीसीआर टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.






Be First to Comment