Press "Enter" to skip to content

खांब येथील वृत्तपत्र विक्रेते भास्कर मोहिते यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🔷🔶🔷🔶

रोहा तालुक्यातील खांब येथील वृत्तपत्र विक्रेते भास्कर गजानन मोहिते यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७५ व्या वर्षी बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या खांब येथील राहत्या घरी निधन झाले.

कै. भास्कर मोहिते हे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुपरवायझर म्हणून नोकरीला होते. खांब सारख्या ग्रामीण भागातील वाचकांना वृत्तपत्र वाचण्यास उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने कै. भास्कर मोहिते यांनी नौकरी सांभाळून १९८९ साली वृत्तपत्र व्यवसाय सुरु केला. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही ते वृत्तपत्र व्यवसाय सांभाळत होते. कै. भास्कर मोहिते यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, चार नातवंड असा मोठा परिवार आहे. कै. भास्कर मोहिते यांची दशक्रिया विधी १९ सप्टेंबर व उतारकार्य २१ सप्टेंबर रोजी त्यांच्या खांब येथील राहत्या घरी होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.