सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🔶🔷🔶🔷
पेण शहरातील प्रसिध्द असणारे विलास डिजीटल या दुकानाचे मालक राजाराम नामदेव पगारे (गुरूजी) यांचे नुकताच वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
राजाराम पगारे गुरूजी यांचा स्वभाव शांत आणि प्रेमळ सर्वांना सुपरिचित असणारे गुरुजी हे पनवेल तालुक्यातील बेलवली जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यावर त्यांनी पेण येथे जवळपास 10 वर्षापुर्वी विलास डिजीटल या नावांने आपले दुकान सुरु केले. त्यामुळे अतिशय प्रेमळ असणा-या गुरुजींच्या पश्चात त्यांना विलास, नितिन अशी दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांचे दहावे नाशिक येथे होणार आहे.






Be First to Comment