सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे (मनोज पाटील ) 🔶🔷🔶🔷
पाणदिवे येथील निवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र धर्मा ठाकूर यांच्या पंच्याहत्तरी वर्षानिमित्त आर्ट शैक्षणिक सामाजिक विकास संस्था पाणदिवे व मनोरे इंग्लिश स्कूल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन स्वरचित काव्यवाचन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली’ मधुबन कट्टा’ या काव्य मंचाच्या व्यासपीठावर आयोजक धीरेंद्र रामचंद्र ठाकूर( सह्याद्री रत्न व संस्थापक – इंग्लिश स्कूल पनवेल)हे होते
या स्पर्धेसाठी राज्यभरातून कविता पाठवले आल्या होत्या चा नुकताच निकाल लागून विजेत्यांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व कवींना प्रमाणपत्र देण्यात आले .
या स्पर्धेचे प्रथम क्रमांक हेमंत बारटक्के-माणगाव ,द्वितीय क्रमांक संजना जुवाटकर-ठाणे,तृतीय क्रमांक शीध्देशजी लखमदे-मुरूड तर उत्तेजनार्थ क्रमांक आशा नरवडे -माणगाव ,रोहिणी सरोदे-पनवेल, माधुरी थळकर -पनवेल यांनी क्रमांक मिळवला या स्पर्धेचे परिक्षक म्हणून रायगड भूषण ए.डी .पाटील ,मच्छिंद्र म्हात्रे व संपदा संजीव पाटील परीक्षकाची भूमिका बजावली.






Be First to Comment