Press "Enter" to skip to content

मनसेच्या शिष्टमंडळाची मंगलम ऑरगॅनिक कंपनीला धडक

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔷🔶

मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या आदेशाने व तालुका अध्यक्ष सचिन कर्नुक नेतृत्वाखाली मौजे खरसुंडी येथील मेसर्स मंगलम ऑरगॅनिक कंपनीला धडक देण्यात आली.

लॉकडाउन काळात सर्व परप्रांतीय कामगार कंपनीला वाऱ्यावर सोडून गेले असताना स्थानिक होतकरू तरुणांनी या काळात अहोरात्र काम करीत कंपनी चालू ठेवण्यास योगदान दिले त्याच कंपनी ने ते परप्रांतीय कामगार परतल्यावर या स्थानिक मुलांना कोणतेही ठोस कारण न देता कामावरून कमी करण्यास सुरुवात केली.याचाच जाब विचारण्यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने कंपनीला धडक दिली झालेल्या सर्व चर्चेअंती सर्व कामगारांना तात्काळ पुन्हा रुजू करू घेण्यात येईल व त्यांच्या वर यापुढे कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असे आश्वासन कंपनी प्रशासनातर्फे देण्यात आले.

या प्रसंगी अभिषेक दर्गे(म.राज्य उपाध्यक्ष मनवासे),अभिजित घरत(खालापूर तालुका सचिव),सतीश घोडविनदे(खालापूर तालुका उपाध्यक्ष),स्वप्नील फराट(अध्यक्ष खालापूर शहर मनविसे),अमोल रसाळ(सचिव खालापूर शहर),सुरेश पवार(वयाळ शाखा अध्यक्ष), शिंदे(वाशिवली शाखा उपाध्यक्ष)व इतर मनसैनिक आणि अन्यायग्रस्त कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या हाकेला धावून आली व एका दिवसात निर्णय दिला याबाबद्दल राजसाहेब ठाकरे व उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.