सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔷🔶🔷🔶
कोव्हीड-19 सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल पतपुरवठा तातडीने प्रधान करण्यासाठी आवश्यकता आहे.
त्यानुसार केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पंतप्रधान स्वनिधी पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेपर्यंत शहरातील पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून खेळते भांडवल 10 हजार कर्ज स्वरूपात बँकेकडून उपलब्ध केले जाणार आहे अशी माहिती कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिली.
सदर योजना दिनांक 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वी शहरांमध्ये पथविक्री करत असलेल्या सर्व पथविक्रेत्यांना लागू असून पथविक्रेते एक वर्षाच्या परत फेड मुदतीसह 10 हजार पर्यंत खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. सदर अर्ज हे विनातारण असेल आणि विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी कर्जाची परतफेड करणारे फळविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील.
सदर कर्जावर आरबीआयच्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू राहतील. पथविक्रेत्यांनी विहित कालावधीमध्ये किंवा तत्पूर्वी कर्जाची परतफेड केल्यास 7 % टक्के व्याज अनुदान मिळण्यास प्राप्त होईल. आणि सदर व्याज अनुदानाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात तिमाही प्रमाणे जमा होईल. तसेच सदर योजनेमध्ये डिजिटल व्यवहार करणाऱ्यासविक्रत्यांना 1200 रुपये कॅशबॅकची सुविधा देण्यात येणार आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पथविक्रेत्याने ऑनलाईन (http://pmsvanidhi.mohus.gov.in) या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक करणे गरजेचे आहे. त्यासाठी नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे. आधारकार्ड,, बँक पासबुक, रेशनकार्ड, मतदान कार्ड, बाजार फी वसुली पावती, डोमीसाईल प्रमाणपत्र, डायव्हिंग लायसन्स, आधार लिंक मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो यांची आवश्यकता भासणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली.






Be First to Comment