Press "Enter" to skip to content

चलो तुळापूर.. छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थानी

छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे चलो तुळापूर अभियान 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) 🔷🔶🔷🔶

छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभे रहावे यासाठी तसेच विविध समस्या संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, विचार, कार्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान महाराज राज्य तर्फे दि 11 सप्टेंबर 2020 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थानी-तुळापूर येथे दुपारी 3 वाजता वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर छत्री नाही. सुरक्षा रक्षक नाहीत, दिवा बत्तीची सोय नाही,साफसफाई होत नाही, रस्ता व्यवस्थित नाही, माहिती बोर्ड (फलक )नाही. कवी कलश यांच्या समाधीवर छत नाही. प्रेमी युगले तेथे येऊन बसतात ह्या सर्व समस्या तेथे असून या समस्या सोडविण्यासाठी, या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे चलो तुळापूर अभियान राबविले जात आहे. नवी मुंबई, मुंबई, रायगड जिल्ह्यातून समाधीस्थळी जाण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली असून अधिक माहितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय चव्हाण फोन नंबर -9920537896,
सुदेश पाटील उरण तालुकाध्यक्ष –
8097100073 यांच्याशी संपर्क साधावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.