Press "Enter" to skip to content

आर पी आय खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर यांना मातृशोक

सिटी बेल लाइव्ह खालापूर( विकी भालेराव)🔷🔶🔷🔶

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धणगावकर यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई अनंत धनगावकर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे.

लक्ष्मीबाई यांचे पती अनंत धर्मा धनगावकर शासकीय सेवेत असताना लक्ष्मीबाई अनंत धनगावकर यांनी पाचही मुलांचा शिक्षण व संगोपन व्यवस्थित रित्या पारे पाडले गेल्या पन्नास वर्षापासून चौक परीसरातील ४४ गावातील समाजाच्या बैठका धार्मिक सामाजिक चळवलीतल्या बैठका धनगावकर यांच्या घरी होत असत.

त्यावेळी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ताची चहा पाण्याची व्यवस्था लक्ष्मीबाई अनंत धनगावकर आनंदाने पार पाडत व त्यांना धार्मिक कार्याची आवड असल्याने पति अनंत धनगावकर यांच्या बरोबर बुद्धगया नेपाल काठमांडू येथे बुद्ध दर्शन केले त्यांच्या जाण्याने समाजातील प्रत्येक घटकामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

लक्ष्मीबाई यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना पनवेल येथील सहस्रबुद्धे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते,मात्र तीन दिवस त्यांचावर उपचार सुरू असताना तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने कोणताही फरक आला नाही, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत माळवली, लक्ष्मीबाई धनगावकर यांचा शोकसभा व पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दि.१३ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्याघरी मौजे चौक ता-खालापूर येथे होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.