Press "Enter" to skip to content

तहसीलदारांचे उरणच्या समस्यां मार्गी लावण्याचे आश्वासन


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

सीआयटीयू, अखिल भारतीय किसान सभा, जनवादी महिला संघटना व डीवायएफआयच्या शिष्टमंडळाची जनतेच्या विवीध मागण्यांबाबत उरणचे तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन त्या मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले.

यावेळी सिडको, उरण नगर परिषद,पंचायत समिती, वीजवितरण कंपनीचे अधिकारी तसेच एसटीचे अगार प्रमुख,व वहातुक नियंत्रक उपस्थित होते. सिडकोने द्रोणागिरी नोड मधील सर्व रस्त्यांची दुरुस्तीची कामे सुरू आहेत, तसेच चारफाटा उरण येथील नाल्याचे व रस्ता निर्मिती कामात चाणजे ग्रामपंचायतने सहकार्य करावे. याठिकाणी ओएनजीसी, वीज वितरण कंपनीने अडथळे दुर करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. यामुळे सुसज्ज रस्ता निर्माण होईल. मासळी मार्केटसाठी स्वतंत्र जागा देण्यात येणार आहे.

रस्त्याच्या कडेला व दुभाजकावर असणारे गवत व वहातुकीस अडथळा असणारी झाडे झुडपे ठेकेदारामार्फत काढली जावीत. करंजा नवीन जेटीकडून येणारा रस्ता व खोपटे पुलाखाली अपघात होऊ नये या दृष्टीने आवश्यक काम करण्यात यावे. नवघर फाटा ते भेंडखळ रस्त्याचे काम प्रस्तावित आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत येणारा करंजा कासवाला रस्त्या, एकटघर ते धुतूम रस्त्याच्या नुतनीकरण करण्याची मागणी यावेळी केली.उरण नगरपरिषद अंतर्गत सुरु असलेली रस्त्याची कामे लवकरच पूर्ण होतील. त्यांनी मान्यता दिल्यास एनएडी तसेच करंजाची एसटीबस तसेच मिनी बस सुरू करावी.

गेली अनेक वर्षे रस्ते विकासाच्या नावाखाली शासनाने करोडो रुपये खर्च केले आहेत परंतु दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्यात जवळजवळ सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत. या रस्त्यांवरील खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे प्रतिक आहे. म्हणूनच या सर्व रस्त्याचे ऑडिट झाले पाहिजे अशी मागणीही करण्यात आली. वीज वितरण कंपनी गव्हाणफाटा येथे नवीन सबस्टेशन उभारणार आहे. तर द्रोणागिरी सेक्टर १२ येथील सबस्टेशन लवकरच सुरू करुन वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणार असल्याचे सांगितले. लवकरच एसटीच्या खारपाडा बस नव्याने सुरू होतील. करंजा व एनएडी. करीता छोट्या बसची मागणी करुन ती या मार्गावर चालवण्याची तयारी केली जाईल.

रेशनिंग व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी मा.तहसिलदार भाऊसाहेब अंधारे प्रयत्नशील रहाणार आहेत, निःसंकोचपणे दुकानदाराने दिलेले धान्य व रेशन कार्ड वर लिहिले माहिती अयोग्य दिसल्यास तक्रार करावी. दर महिन्याला धान्याची माहिती दुकानदाराने फलकावर लिहीली पाहीजे. तक्रार आल्यास संबंधित स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली जाईल. सर्व ग्राहकांना सुरळीत धान्यपुरवठा होईल याची काळजी घेतली जाईल. तसेच करंजा येथील पाणी पुरवठा नियमित होण्यासाठी तहसीलदार प्रयत्नशील राहतील असे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभाग व NHAI चे अधिकारी अनुपस्थित होते या बैठकीत सीआयटीयूचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड भूषण पाटील, किसान सभेचे सेक्रेटरी कॉम्रेड संजय ठाकूर, डीवायएफआयचे राज्य कोषाध्यक्ष संतोष ठाकूर, जिल्हा अध्यक्ष दिनेश म्हात्रे, ऍड विपुल ठाकूर जनवादी महिला संघटनेच्या निराताई घरत, रजनी पाटील, गिता पाटील, सुनंदा वाघमारे, अपर्णा म्हात्रे, रसिक घरत, छाया मढवी, रुपाली पाटील सहभागी झाल्या होत्या. या बैठकीत सकारात्मक चर्चा घडवून आणल्या बद्दल तहसिलदारांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.