Press "Enter" to skip to content

स्थानिक तरुणांना नोकरीत प्राधान्य द्या, अन्यथा मनसेशी गाठ! 

सुधागड तालुक्यातील सर्व कंपनी व्यवस्थापनाला मनसेचा खळ खट्याकचा इशारा

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔶🔷

सुधागड तालुक्यात अनेक कंपन्या, उद्योगधंदे व प्रकल्प आहेत. मात्र येथील स्थानिक, सुशिक्षित बरोजगार रोजगाराअभावी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. येथील कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार व नोकरी देण्याची मागणी आता मनसेने लावून धरली आहे.  मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांनी नुकतीच केली आहे. अन्यथा खळ खट्याक करण्याचा इशारा कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे. अनेक कंपन्यांत जाऊन मनसे व्यवस्थापनाला स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर चर्चा करून तरुणांना नोकऱ्या देण्याचे आवाहन करीत आहे.

     सुनील साठे यांनी सांगितले की आज संपूर्ण जगात कोरोना महामारीचे संकट  आहे. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसमोर जगण्याचे कोणतेही साधन नाही, अनेकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अशातच येथील स्थानिक तरुणांना हाताला काम नाही आहे. रोजगार उपलब्द नसल्याने तरुण वर्ग निराश आहे.  येथील तरुणांमध्ये पात्रता, कौशल्य व क्षमता असतांनाही परराज्यातून आलेल्या लोकांना येथील कंपन्या काम देत आहेत. परिणामी येथील तरुण बेरोजगार राहत आहेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगार व नोकऱ्यांची मागणी मनसेने केली आहे. येथील कंपन्यानी या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अन्यथा गाठ मनसेशी आहे असा इशारा साठे यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.