Press "Enter" to skip to content

डॉ. सुशील पाटील यांच्याकडून कोविड सेंटरला ब्लड शुगर चेक करणारे मशीन भेट

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷

कोविड केअर सेंटरला उरण (घोणस उरण येथील कार्यशील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड शुगर चेक करण्यासाठी आवश्यक असलेली मशीन 100 स्ट्रिप्स सहित हॉस्पिटलला दान केली.

सदर मशीन कामगार नेते संतोष पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गरजू रुग्णांना आत्ता शुगर टेस्ट साठी वणवण फिरावे लागणार नाही.त्या बद्दल डॉ. सुशील पाटील यांचे मनापासून आभार मानण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.