सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे ) 🔷🔶🔷🔶
शासनाच्या अनेक योजना आदिवासी समाजासाठी आहेत. मात्र या कोरोना व्हायरसमुळे सर्व सामान्य माणसांच्या जिवनात आमुलाग्र बदल आणला आहे. शासनाने आदिवासी समाजाच्या आरोग्य सेवेसाठी ई- संजिवनी ॲप आणला असला तरी तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये लाईट आणि मोबाईलच्या नेटवर्कची कमतरता असल्यामुळे हा समाज नेहमीच या सेवांपासुन वंचित राहिला आहे. मात्र या ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण झूम वर घेण्याची व्यवस्था करून घेतल्यामुळे लोकमंच संघटनेचे कार्यकर्ते गणेश वाघमारे प्रशिक्षित झाले आहेत.
मागिल सहा महिन्यांपासून समाजमध्ये नेतृत्व करणारे युवक तसेच महिलांना लोकमंच, मकाम या राष्ट्रीय स्तरावरील नेटवर्क झूम द्वारे जोडण्यात आले आहे. या प्रशिक्षणा अंतर्गत अंकुर ट्रस्टच्या सर्वेसर्वा आणि सामाजिक कार्यकर्ता अॅड. वैशाली पाटील यांनी सांगितले की, या निसर्ग चक्रीवादळमुळे कोलमडेली विद्युत व्यवस्था आद्यापही या आदिवासी भागांमध्ये पाहिजे तशी सुरू झाली नाही. त्यामुळे हा समाज नेहमीच या पासून अलिप्त राहिला आहे. तेव्हा शासनाने आदिवासी समाजासाठी अधिक लक्ष घालून यांना प्रवाहात आणावे असे त्यांनी सांगितले.






Be First to Comment