सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (ऩंदकुमार मरवडे) 🔶🔷🔶🔷
राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिति शाखा रोहा आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजनदि.११ सप्टें.रोजी सायं.ठिक ४:१५ वा. झुम क्लाउडवर करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
करिअर मार्गदर्शन वेबिनार या विषयातंर्गत विद्यार्थी आणि पालकांसाठी सदर विशेष मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सुहास पाटील माजी केंद्रीय उपायुक्त, मुंबई स्तंभ लेखक दैनिक लोकसत्ता, नोकरीची संधी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून त्यांनी आज पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात 10,000 हुन अधिक व्याख्याने केली आहेत.
या शिबिरात आवड़ीनुसार करिअर क्षेत्र कसे निवाड़ावे,शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ति कोणत्या ?
अपयशामुळे येणारा न्युनगंड कसा घालवावा, व आत्मविश्वास कसा वाढवावा ? चाकोरीबद्ध शिक्षणपद्धती शिवाय करिअरच्या नव्या संधी कोणत्या ? MPSC, UPSC, रेल्वे, बैंक आणि स्टाफ सिलेक्शन यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी ? विद्यार्थांनी अभ्यास कसा करावा ? संरक्षण दलातील नोकारीच्या संधी कोणत्या ? अशा अनेक महत्वाच्या करिअर संदर्भातील विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिराचे नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी दिनेश शिर्के,प्रधान सचिव रोहा शाखा ७६२०३३४४६६,प्रमोद खांडेकर,युवा सहभाग रोहा शाखा ९२७०५४४४८६ ,टिळक खाडे, रोहा शाखा सल्लागार ७७९८०२७२७१ यांच्याशी संपर्क साधण्याच अवाहन करण्यात आले.
तर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/3357717541?pwd=eFp1ZHZLSE50dGJxUGV5ZHFzb0dhQT09
लिंकला ठच करून जाँईन व्हावे असे सांगण्यात आले आहे.






Be First to Comment