सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)🔶🔷🔶🔷
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा.पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई या विद्यालयाच्या प्रांगणात भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष, कामगार नेते व स्कूल कमिटी सदस्य सुरेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले.
या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे व विद्यालयातील शिक्षक वर्ग सोशल डीस्टनस पाळून यामध्ये सहभागी झाले होते. विद्यालयात आता नव्याने रुजू झालेले प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांच्या संकल्पनेतून सदर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला गेला होता. विद्यालयातील शिक्षक व रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नूरा शेख यांनी विशेष मेहनत घेऊन सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी झाला.






Be First to Comment