Press "Enter" to skip to content

मुख्यमंत्र्यांच्या फार्मंहाऊसची चौकशी करणारे एटीएसच्या ताब्यात

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔶🔷

चौक हद्दीतील भिलवले येथे मुख्यमंत्री यांच्या फार्महाऊसची चौकशी करणारे यांच्या एटिएस ने मुसक्या आवळल्या आहेत.

चौक-कर्जत रस्त्यावर भिलवले गावच्या हद्दीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फार्महाऊस आहे,काल सायंकाळी या ठिकाणी एका टुरिस्ट गाडीतून तिघेजण या फार्महाऊस ची चौकशी करत आले होते,त्यांनी फार्महाऊसच्या सुरक्षारक्षक याच्याकडे इम्तियाज नावाच्या माणसाची चौकशी केली,आपण अशा माणसाला ओळखत नाही व अशा नावाचा माणूसही येथे काम करीत नाही असे सुरक्षारक्षक याने सांगितले,पण आलेल्या तिघांनी धमकी दिली व निघून गेले,मात्र सुरक्षारक्षक यांनी या टुरिस्ट गाडीचा नंबर घेऊन तो पोलीस व मुख्यमंत्री यांना कळविला,लागलीच सर्व पोलीस यंत्रणा सावध झाली,नविमुंबई हद्दीत रायगड जिल्ह्यात एटीएस ने या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.रायगड पोलीस अधीक्षक हे देखील खालापूर या ठिकाणी येऊन एटीएस बरोबर चौकशी करीत असल्याचे समजते.

मुख्यमंत्री यांचे मुंबईत असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी व मुख्यमंत्री यांच्या बरोबर गृहमंत्री यांनाही जीवे मारण्याची धमकी काही दिवसांपूर्वी आली होती,त्याच पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणा सावध झाली आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सुमारे २५ वर्षांपासून खालापूर तालुक्यातील भिलवले धरणाच्या कडेला फार्महाऊस आहे,कधीतरी वेळ काढून ते येथे विश्रांती घेण्यासाठी यायचे, स्व.मीनाताई ठाकरे यांची ही आवडती जागा होती.

येथूनच त्या मुंबईत जात असताना वाटेत हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले.फार्महाऊस वर मुंबई पोलीस यांच्यासह रायगड पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.