सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)🔷🔶🔷🔶
रायगड जिल्हा जनवादी महिला संघटनेच्या वतीने उरण तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करून तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात जनवादी महिला संघटनाने मोफत धान्य मिळाले पाहिजे,एस.टी.बस सेवा सुरू करा, रोजगार हमी योजनेअंतर्गत काम चालू करा, विजबिल माफ करा,
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई द्या, ऑनलाईन शिक्षण पद्धती रद्द करा ह्या मागण्या करून या विषयावर चर्चा झाली.
यावेळी हेमलता पाटील, छाया मढवी, रसिका घरत, निराताई घरत, सुनंदा वाघमारे, रुपाली पाटील, रजनी पाटील, गिता पाटील, अपर्णा म्हात्रे , वकील संपदा म्हात्रे आदी उपस्थित होते.






Be First to Comment