खुल्या मनाचा देव माणूस हरपला सर्वत्र भावना व्यक्त 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम)🔷🔶🔷🔶
संभे गावचे सुपुत्र , कोलाड विभाग संघटनेचे माजी अध्यक्ष व रायगड जिल्ह्यातील नाभिक समाजाला देवरूपी माणूस म्हणून ओळखला जाणारा देव माणूस अनंता पांडुरंग सपकाळ यांचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले .
त्यांच्या मृत्यू समयी वय ६५ वर्ष होते. रायगडचा नाभिक समाजाला सर्वांगीण विकासात्मक दूरदृष्टीचा चेहरा म्हणून ओळखला जाणारा ढाण्या वाघ हरपला गेल्याने रायगड जिल्हा सह कोलाड विभागावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि पितृतुल्य असेल वडीलधारी गेल्याने कोलाड विभाग पोरका झाला .
त्यामुळे एक सच्या नाभिक फक्त गेल्याची भावना सकल नाभिक समाजाकडून व्यक्त केली जात आहे.
रायगडजिल्हा नाभिक समाजातील कोलाड हे केंद्रबिंदू कोलाड हे आहे . कोलाड येथील आंबेवाडी येथे भव्यदिव्य असे सभागृह नाभिक समाजाचे उभा आहे या मंदिरासाठी पाच ते सहा जागा आईच्या नावाने अनंता सपकाल यांने खुल्या मनाने दान केली त्यामुळेच आज तर समाजाची ओळख आहे.
या सभागृहासाठी विनामूल्य जागा देऊन मंदिर उभे राहिले. सकपाळ यांची घरची परिस्थिती गरीब पण मनाची श्रीमंती अशी मोठी ख्याती त्यांची होती. यांचा स्वभाव निस्वार्थी होता त्यामुळे अशी व्यक्ती या समाजात परत होणे नाही. विभागात काही अनेक दशके ते आजतागायत विभागाचा ढाण्या वाघ म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध होते. त्यांनी नाभिक समाजाला जमीन दान करून उदार मनाने असेच स्वतःच्या पाठीशी कोणतेही पाठबळ नसताना शून्यातून विश्व निर्माण करून बहुजन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
समाजातील निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती होती . एक नाभिक समाज भक्त असल्याने स्वतःची मालकी अक्का ची जागा सभागृह बांधण्यासाठी विनामूल्य दिली. त्यामुळेच आज विभाग संबंध रायगड जिल्ह्याचे केंद्रबिंदू असल्याने जिल्ह्याचे कारभार इथूनच व्यवस्थित चालत आहे . त्यांच्या कार्याने समाजासाठी अजरामर राहील त्यांचे नाव रायगड जिल्ह्यात अविस्मरणीय कायमस्वरूपी राहील यासाठी रायगड जिल्हा प्रयत्न करेल अशी माहिती रायगड नाभिक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुदाम शिंदे यांनी दिली .
अनंत सकपाळ यांच्या रविवारी सायंकाळी छातीत दुखू लागल्याने तात्काळ डॉक्टर जाधव हॉस्पिटल येथे दाखल केले परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला आणि सपकाळ यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या निधनाची बातमी कळताच रायगड जिल्ह्याचे चे जिर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष टक्के , रायगड जिल्ह्याचे नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुदाम शिंदे ,प्रविण पवार , खराडे आण्णा, यांना सदानंद साळुंखे , किशोर खडांगले, काशिनाथ रावकर , विभागीय अध्यक्ष संजय सकपाळ यासह अनेक नाभिक समाजातील इतर समाजातील ज्येष्ठ मंडळींनी धाव घेतली.
आनंद सपकाळ यांच्या व्यक्तिमत्वाची छाप संडे गावासह कोलाड नाभिक समाजावर कायम राहिली त्यांच्या निधनाने कोलाड विभाग आज पोरका झाला अशी भावना कोला विभाग तर्फे व्यक्त करण्यात आली . अनंता यांच्या पश्चात पत्नी मुली जावई नातवंडे असा मोठा गोतावळा आहे त्यांची दशक्रिया १५/९/२०२०, उत्तरकार्राय १७/९/२०२० त्यांच्या संभे येथील रहत्या निवस्थानी होणार असल्याची माहिती सपकाळ कुटुंबीय यांनी दिली.






Be First to Comment