Press "Enter" to skip to content

नागोठण्यात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे निवेदन

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🔶🔷🔶🔷

नागोठणे शहरातील मोहल्ला भागासह इतर सर्व भागांतही वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शाळांचे ऑनलाईन वर्ग तसेच ऑनलाईन क्लासेस यामध्ये व्यत्यय येत आहे. नागोठण्यातील वीजपुरवठा दिवसांतून अनेकवेळा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याशिवाय मुस्लीम समाजाला सर्व धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने घरातच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने मोहल्ला भागासह संपूर्ण शहरातील विजदुरुस्तीची सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे नागोठणे शहर सचिव उमर सांगाडे यांनी यांनी वीजवितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वैभव गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य अखलाक पानसरे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, युवक राष्ट्रवादीचे नागोठणे शहर अध्यक्ष दिनेश घाग, युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मनोज टके, मुदस्सर मुल्ला आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

नागोठणे मोहल्ला भागासह शहरातील सर्व भागांतील तांत्रिक दोष दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असून लवकरच शहरातील वीजपुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन यावेळी उपभियंता वैभव गायकवाड यांनी युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.