ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांचे 65 व्या वर्षात पदार्पण 🔷🔶🔷🔶
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पनवेल 💠🌟💠🌟
पनवेल पत्रकार संघर्ष समिती चे सल्लागार,दैनिक रायगड नगरी चे संस्थापक संपादक,ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांचा जन्मदिन आज साजरा करण्यात आला.त्यांनी 65 व्या वर्षात पदार्पण केले.पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती च्या वतीने साध्या पद्धतीने छोटेखानी कार्यक्रमाद्वारे सुनील पोतदार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

संघर्ष समिती चे सरचिटणीस मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. प्रास्ताविकातून त्यांनी दादांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उपस्थितांना उलगडून दाखवले.अध्यक्ष नीलेश सोनवणे यांनी केक भरवून सुनील पोतदार यांचे अभिष्टचिंतन केले.यावेळी त्यांच्या समवेत सिटी बेल लाईव्ह चे ग्रुप एडिटर विवेक पाटील,सामनाचे संजय कदम. संघर्ष समिती चे खजिनदार केवल महाडिक,रसायनी टाईम्स चे संपादक अनिल भोळे, साप्ताहिक माझे पनवेलचे संपादक विशाल सावंत,रायगड नगरी चे संपादक राकेश पितळे, वचन गायकवाड,अरविंद पोतदार,सचिन पोतदार,प्रतीक वेदपाठक,गोविंद पाटील,सुनील वारगडा,भारत बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.






Be First to Comment