Press "Enter" to skip to content

करंजा गावात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता ?


परप्रांतीय खलाशांकडून नियमांचे उल्लंघन : पहा हा व्हिडिओ 🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶

करंजा गावात दोन-तीन महिन्यापूर्वी कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उरण तालुक्यातही त्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दोन-तीन महिन्यापूर्वी करंजा गावात मयताला उपस्थित असणाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याची लागण गावातील अनेकांना झाली होती. त्यामुळे तालुक्यात हाहाकार माजला होता. याला दोन-तीन महिन्यांचा अवधी उलटून गेला आहे. या घटनेपासून ग्रामस्थांनी बोध घेतला नसल्याचे दिसते.
करंजा जेट्टीवर मासेमारी बोटीवर काम करणारे खलाशी मोठ्या प्रमाणात आले आहेत. सदर खलाशी हे परराज्यातील असल्याचे समजते. हे खलाशी आल्यानंतर त्यांना कॉरोंटाईनही न होता ते कामास सुरुवात करीत आहेत. जेट्टीपरिसरात तसेच इतर अनेक ठिकाणी खलाशी वर्गांचा तांडाच्या तांडा मासेमारी जाळी नीटनेटके करीत असल्याचे दिसत आहेत. मासेमारी जाळी तसेच इतर कामे ते कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंट, मास्क व इतर नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करून वावरतांना दिसतात. गावात अनेकजण मास्क न वापरता गावाभर फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तसेच पहाटे भरणाऱ्या मासळी मार्केटमध्ये मासळी खरेदी करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, वाशी, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल आदी ठिकाणांची व्यक्ती मासळी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करीत आहेत. याकडे कोणी लक्ष देताना दिसत नाही अशी माहिती गावातील ग्रामस्थांनी दिली.

अशा प्रकारे परप्रांतीय खलाशी वावरत असतील व मासळी मार्केट भरत असेल तर उरणसह करंजा गावात पुन्हा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची भीती तालुक्यातील जनतेला वाटत आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.