Press "Enter" to skip to content

नागोठण्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक नामफलकाचे लोकार्पण

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🔶🔷🔶🔷

नागोठण्यातील गजबजलेला नाका असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू जनजागृती समितीकडून आणि शिवप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने नव्यानेच उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या डिजिटल नामफलकाचे लोकार्पण नागोठण्यातील प्रसिद्ध तरुण वकील व भारत रक्षा मंचच्या महाराष्ट्र प्रदेश विधी प्रकोष्ठाचे अध्यक्ष अॅड. श्रीकांत रावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंगळवारी (दि. ८) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आले.

त्यावेळी उपस्थित शिवभक्त तरुणांकडून “श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी”, “हर हर महादेव” या जयघोषांच्या घोषणांनी संपूर्ण छ. शिवाजी महाराज चौक व छ. शिवाजी महाराज पेठ परिसर दणाणून गेला. हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखंड हिंदुस्तानचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकात नामफलक असावे अशी प्रबळ इच्छा नागोठण्यात नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या हिंदू जनजागृती समिती कडून काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी व शिभक्त तरुणांनी याकामी झपाटल्यासारखे स्वताला वाहून घेतले. त्यासाठी नागोठण्यातील अनेक शिवप्रेमी नागरिकांनी या कार्याला सर्वोतोपरी सहकार्य केले. त्याचेच पर्यवसान म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकात छ. शिवाजी महाराजांच्या या नामफलकाचे लोकार्पण उत्साहात पार पडले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.