Press "Enter" to skip to content

मनसे चा फायनान्स कंपन्यांना ईशारा !

ग्राहकांचे मानसिक शोषण थांबवा अन्यथा गाठ आमच्याशी आहे

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे 🔷🔶🔷🔶

कर्जत तालुक्यात अनेक फायनान्स कंपन्या आहेत . होतकरू महिला , तर गरजू नागरिकांनी बजाज फायनांस, बंधन, तसेच सुर्योदय फायनांस , सेन्ट्रम बँक , एकविटास बँक , आदी कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे , मात्र कोरोना संसर्ग महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाले , रेल्वे सेवा बंद झाली त्यामुळे मार्च ते आजपर्यंत अनेक नागरिक घरीच आहेत . त्यामुळे घेतलेले कर्ज देता न आल्याने ते वाढत चालले आहे . पैसे अभावी घरखर्च , प्रपंच आजारपण या सर्व गरजा पूर्ण करताना कुटुंब प्रमुखाची घालमेळ होत आहे त्यातच या फायनान्स कंपन्या हफ्ते भरण्यासाठी सारखा तगादा लावत असल्याने अनेक कर्जदार ग्राहक मानसिक तणावाखाली आले आहेत .

बँकेचे अधिकारी फोनवर धमकावणे , हप्ता कधी देणार असा तगादा लावणे असभ्य व उर्मठ भाषा वापरणे , या त्यांच्या कृत्याच्या तक्रारी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या पदाधिका-यांच्या कडे गेल्याने मनसे आक्रमक झाली असून त्यांनी थेट या बँकेतच धाव घेतली व बँकेच्या अधिका-यांना धारेवर धरून मनसे स्टाईलचा दणका दिला .

ज्या कर्जदारांकडे पैसे नसतील त्यांना हप्ता भरण्यास मुदतवाढ द्या , यापुढे कोणालाही फोन वरुन धमकाउन हप्ता वसुल करण्याचा प्रयत्न केला तर गाठ मनसे बरोबर आहे , कर्जदार ग्राहकांचे मानसिक शोषण ताबडतोब थांबवा अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.

यावेळी समीर चव्हाण – कर्जत शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली , धनंजय दुर्गे – नगरसेवक , चिन्मय बडेकर – शहर सचिव , प्रविण बोराडे – ता.उपाध्यक्ष , राजेश साळुंके कर्जत ता . उपाध्यक्ष , योगेश सुर्वे – उपाध्यक्ष , ओंकार मोरे , हीमांशु चाचड , संदेश काळभोर , दिनेश कदम , प्रथमेश घोलप , आकाश कांबळे , सर्वेश पवार आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.