Press "Enter" to skip to content

खारी – काजुवाडी अंतर्गत मार्गावर मोकाट गुरांचे प्रवासी वाहतुकीस अडथळे

अपघातांच्या प्रमाणात वाढ : गुरांचे मालक जोमात तर अपघात ग्रस्त कोमात

सिटी बेल लाइव्ह / रोहे (नंदकुमार मरवडे/केशव म्हस्के) 🔶🔷🔶🔷


रोहा तालुक्यातील खारगाव ग्राम पंचायत हद्दीतील खारी – काजुवाडी – तारेघर अंतर्गत रस्त्यांवर मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या मधोमध ठिय्या बसलेला आढळून येत असल्याने प्रवासी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थ वाहन चालकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जीवाला धोका निर्माण झाला आहे.

मोकाट गुरे ही गावामध्ये एखादे रिकामे घरांचे वरांडे,पडवी दिसताच ही मोकाट कुत्री,गुरे – ढोरे त्याचे गोठ्यात रूपांतर करतात तरी देखील गुरांचे मालक निवांत पणे घरीच झोपा काढत असतो..

या मोकाट गुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी निर्माण होते.तर वाहन चालकांच्या घाईगडबीत मोठ्याले अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.यातच जर दुर्दैवाने एखाद्या गुराचा अपघात झालाच तर मालक वर्ग भरपाई मिळावी म्हणून धावत पळत येतो,परंतु आपल्या गुरांमुळें एखाद्याचे अपघाता मध्ये हात-पाय फ्रॅक्चर झाले तर गुरांचा शेतकरी मालक वर्ग जवळ सुध्दा फिरकत नसल्याने अनेकदा समोर आले आहे.अश्या वेळी एक विनोदच होऊन जातो की मोकाट गुरांचे मालक जोमात तर अपघात ग्रस्त कोमात अशीच काय ती अवस्था होते..

अश्या मोकाट ढोरा – गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्राम पंचायत प्रशासना च्यां माध्यमातून गुरांच्या मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी समज देण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांसह प्रवासी ग्रामस्थ वर्गातून केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.