Press "Enter" to skip to content

कर्जत मधील ती धोकादायक इमारत जमीनदोस्त होणार : नगरपरिषदेची नोटीस

सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔷🔶🔷🔶

कर्जत नगरपरिषद हद्दीत " बोहरी समाज हॉल "समोर ” नित्यानंद सोसायटीची ” इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. ही इमारत पडली तर जिवीत हानी होण्याची शक्यता त्यामुळे ही इमारत जमीनदोस्त करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप गडकरी यांनी केली होती या मागणीची दखल घेऊन नगरपरिषदेने सोसायटीचे चेअरमन यांना नोटीस काढून इमारत 24 तासांत जमीनदोस्त करण्याची सूचना दिली आहे.

1972 साली बांधलेल्या हया इमारतीत गेल्या पंधरा वर्षापासून कोणी रहात नाही. हया इमारतीला चारी बाजूने वड, पिंपळ, आदी झाडांनी वेढले आहे. ” पडक्या इमारतीस झाडांचा आधार ” अशी सध्या परीस्थिती आहे. ही झाडे दुसऱ्या मजल्याच्याही वर जाऊन पोहोचली आहेत.ही इमारत साक्षात मृत्यूचा सापळा बनली असून कधीही कोसळू शकत असल्याने नित्यानंद इमारत कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून नगरपरिषदेने ही इमारत जमीनदोस्त करावी अशी मागणी गडकरी यांनी केली होती.

सामाजिक कार्यकर्ते दिलीप गडकरी यांच्या पत्राची दखल घेऊन कर्जत नगरपरिषदेने नित्यानंद नगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित कर्जत तर्फे चेअरमन वीरचंद धनराज ओसवाल व इतर सभासद यांना नोटीस बजावली आहे, सदर नोटीस मध्ये कर्जत येथील सिटी सर्व्हे नंबर 174 / 38 या जागेवरील आपल्या मालकीची नित्यानंदनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या नावे इमारत असून सदरची इमारत धोकादायक झालेली असून कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजूबाजूचे रहिवासी व पादचारी नागरिकांना धोका संभावत आहे.

याबाबत पूर्वी कार्यालयाकडून महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 195 अन्वय नोटीस बजावण्यात आलेली असून अद्याप पर्यंत आपण आपण कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

आपल्या मालकीची असलेली इमारत त्वरित 24 तासाच्या आत पाडून जमीनदोस्त करावी तरच सदरची इमारत पाडण्याचे काम तज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात यावे जेणेकरून कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी सदर इमारतीमध्ये आपले काही दस्तऐवज मौल्यवान वस्तू गोष्टी असल्यास काढून घेणे आवश्यक आहे. नंतर कुठल्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही यासाठी सर्वस्वी जबाबदारी आपली राहील तसेच विहित मुदतीत आपण सदर इमारत तोडून जमीनदोस्त न केल्यास सदरची कार्यवाही नगरपरिषदेतर्फे करण्यात येईल. व त्या कामी येणारा खर्च हा आपणांकडून मालमत्ता करात किंवा इतर प्रकारे वसूल करण्यात येईल आपणावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी नोटीस नगरपरिषदेच्या वतीने 7 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी बजावली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.