Press "Enter" to skip to content

श्री.पुरुषोत्तम(अधिक) मासा निमित्त अखंड हरिनाम  महोत्सव 


सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔶🔷🔶🔷

 वै.श्री० गणपत बाबा अलिबागकर महाराज व वै.गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे अलिबागकर महाराज श्री० क्षेत्र पंढरपूर यांच्या कृपा आशिर्वादाने परंपरेनुसार चालत आलेला २७ वा श्री.पुरुषोत्तम (अधिक )मास अखंड महोत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४२ शुक्रवार दि.१८/९/२०२० ते शुक्रवार दि.१६/१०/२०२० अधिक  अश्विन वद्य अमावाश्या पर्यंत गुरुवर्य ह.भ.प.श्री.नारायण दादा वाजे अलिबागकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सद्गुरु अलिबागकर महाराज मठ, कसार घाट ,पंढरपूर येथे संपन्न होणार आहे
                       

पहाटे ४.३०ते ७.३०नित्य काकड आरती,भजन व पूजा,सकाळी ८.०० ते ९.०० वा.श्री.विष्णू सहस्त्र नामपाठ व जय जय राम कृष्ण हरी बीज मंत्र जप,सकाळी ९.३० ते१०.३० श्री० ग्रंथ  राज ज्ञानेश्वरीचे पारायण,११ ते १ वा.श्री. तुकोबारायांचे गाथा भजन,दुपारी ४.००ते५.००महभारत व पुराण वाचन,सा.५ते ६.३० हरिपाठ,७ ते९ किर्तन व नंतर हरि जागरण असे कार्यक्रम होणार असुन सर्वाच्या जिवनात मोठा अमृत योग आहे.तरी या सोहळ्यात व पर्वणीत सर्व भाविकांनी काया, वाचा,मन,धन,व सर्वभावी पुरुषोत्तमाची सेवा करुन कृतार्थ व्हावे.असे सर्व भाविकांना सांगण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.