सिटी बेल लाइव्ह / प्रतिनिधी / उलवे 🔶🔷🔶🔷
पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्रीरंग कमलासनन यांच्या उलवे नोड येथिल जनता सुपर मार्केटचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे सदस्य तथा कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. या सुपर मार्केटमधे सर्व प्रकारचे किराणा सामान गृहपयोगी वस्तु एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
उलवे काँग्रेस कमिटीतर्फे लॉकडाऊच्या काळात महेंद्रजी घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे नोड येथिल नागरिकांना श्रीरंग कमलासनन व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्फत अन्नधान्य, फळभाज्या, शिजवलेले अन्नाचे मोठया प्रमाणात वाटप करण्यात आले होते. सर्वसामान्यांना एकाच ठिकाणी माफक दरात सर्व गृहपयोगी वस्तू उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हे जनता मार्केटचे उद्घाटन करण्यात आले आहे.
सुपर मार्केटच्या उद्घाटना प्रसंगी पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव कटेकर, पनवेल महानगरपालिका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुदाम पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील, पनवेल विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, उरण तालुका युवक कांग्रेस अध्यक्ष रोहित घरत, श्रीरंग कमलासनन व त्यांचे सहकारी उपस्थित होते.






Be First to Comment