सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनील ठाकूर ) 🔶🔷🔶🔷
उरण मोरा येथील सामाजिक कार्यकर्ते ,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे युनिट सेक्रेटरी कॉम्रेड प्रकाश कोळी यांचे २सप्टेंबर रोजी हृदय विकारच्या झटक्याने वयाच्या ६३व्या वर्षी निधन झाले. ते मोरा ग्रामस्थ मंडळाचे संस्थापक सदस्य होते.
ग्रॅन्डवेल नॉर्टन कंपनी युनियनचे पदाधिकारी म्हणून काम केले.मोरा मच्छिमार सोसायटीचे संस्थापक सेक्रेटरी होते.मोरा शिक्षण विभाग मंडळाचे सेक्रेटरी होते.मोरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त प्रगती वाचनालयाचे माजी चेअरमन व विद्यमान सेक्रेटरी होते .जे एम म्हात्रे न्यु इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेचे सेक्रेटरी होते.
मांगिरलाल झोपडपट्टी,भवरा परीसरात वीज पुरवठा ,पाणी पुरवठा सुरु व्हावा याकरिता माजी नगरसेविका ज्योती कडू, कामगार नेते दत्ता कडू यांच्या सोबत कार्यरत होते.
लाल बावट्याच्या कामगार, शेतकरी , श्रमिकांच्या लढ्यात, जनतेच्या ज्वलंत मागण्याच्या सर्वच लढ्यात अग्रभागी असतं. अशा स्वच्छ ,प्रामाणिक,सर्वांच्या सुखद:खात विनाविलंब धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता हारपल्याने मोरा परिसरातील जनतेने हळहळ व्यक्त केली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने श्रध्दांजली सभा आयोजित केली. कॉम्रेड प्रकाश कोळींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्रध्दांजली वाहिली.या सभेत सी.आय.टी.यू.चे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड भूषण पाटील,अ.भा. किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड संजय ठाकूर यांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन श्रध्दांजली वाहिली.
यावेळी कामगार नेते शशी यादव,सतिश खरात,कुदरत मुलानी, राजेंद्र फडतरे,युवा नेते संतोष ठाकूर, रविंद्र कासूकर, राकेश म्हात्रे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या निराताई घरत, बोकडविरा युनिट सेक्रेटरी कॉम्रेड पद्माकर पाटील , जेष्ठ पत्रकार जगदीश तांडेल व चळवळीतील इतर सहकारी शारिरीक अंतर राखून व मास्क लावून उपस्थित होते.






Be First to Comment