सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷
कर्जतधील ज्या सरकारी, निमसरकारी, खाजगी शाळा,उच्च माध्यमिक शाळा, कॉलेज इमारत निधि व प्रवेश शुल्काच्या नावाखाली शासनाच्या आदेशाविरूद्ध पैसे उकळतात अशा शाळांवर कारवाई करा अशी मागणी सम्यक विदयार्थी आंदोलन राज्य उपाध्यक्ष अँड. कैलास मोरे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे शिक्षणाधिकारी व अभिनव ज्ञान मंदीर यांना निवेदन देण्यात आले की, अनेक शाळांची प्रवेश प्रकीया सुरू आहे.अनेक शाळा, कॉलेज इमारत निधी तसेच प्रवेश शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या भरमसाठ फी वसुली करीत आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम 2011 तसेच फी घेणे संदर्भातील इतर कायदयानुसार, शासनाने दिलेल्या आदेशानुसार अशा शाळांनी विदयार्थ्यांकडुन प्रवेश शुल्क आकारले पाहिजेत.तसेच मा.शिक्षणमंञी, महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा कोरोना तसेच लॉकडाऊन मधील परिस्थीतीचा विचार करून सरकारी व खाजगी शाळांना शाळा सुरू होईपर्यंत कुठल्याही प्रकारची फि घेण्याची नाही तसेच त्यासाठी सक्ती करणेची नाही असे आदेश दिलेले आहेत.
परंतु अनेक शाळा कायदयाचे व नियमांचे पालन न करता विदयार्थ्यांकडून इमारत निधी तसेच इतर शुल्काच्या नावाखाली पैसे वसुल करीत आहेर तसेच शुल्क वसुलीसाठी पालक, विदयाथ्यांकडे तगादा लावत आहेत.तसेच RTE कायदया अंतर्गत पाञ विदयार्थ्यांकडुन काही शाळा बेकायदेशीररीत्या फी वसुल करीत असलेचे निदर्शनास आलेले आहे.सदरची बाब विदयार्थ्यावर अन्यायकारक अशी आहे.हयासंदर्भात आमच्याकडे अनेक पालकांनी तक्रारी केलेल्या आहेत.
मार्च 2020 पासुन कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू आहे.त्यामुळे अनेकांच्या नोक-या, व्यवसाय बुडालेले आहेत.अशा परिस्थीतीत विजबिले, आरोग्य, घरखर्च, शैक्षणिक खर्च आदि खर्च आहेत.यामुळे लोकांची आर्थिक अवस्था खुप बिकट आहे.अशा पस्थिीतीत पालकांकडे त्यांच्या पाल्याची शैक्षणिक शुल्क भरणेसाठी सुद्धा पैसे नाहीत.
म्हणुन कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या झालेल्या बिकट आर्थिक परिस्थीतीचा विचार करून आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांना आपल्यामार्फत पञ पाठवुन बेकायदेशीररीत्या विदयार्थ्यांकडुन इमारत निधी व इतर शुल्काच्या नावाखाली फी वसुल करू नये तसेच फी संदर्भातील प्रचलित कायदे व शासननिर्णयानुसारचं शुल्क घेणेसंदर्भात पत्र पाठवुन तसे सक्त आदेश दयावेत हि विनंती शिक्षणाधिकारी यांना केली आहे. तसेच अशाच प्रकारचे निवेदन अभिनव ज्ञान मंदिर ह्या संस्थेला देवुन शासनाच्या आदेशानुसारचं प्रवेश शुल्क घ्या अन्यथा त्रीव स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सदर निवेदनाची प्रत महाराष्ट्र प्रदेश शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच संबंधित सर्व अधिकारी यांना पाठविली आहे. सदर निवेदन देताना अँड कैलास मोरे, हरिश्चंद्र यादव, सुनिल गायकवाड, अनिल गवळे, अनंता गायकवाड, धर्मेंद्र मोरे, राहुल गायकवाड, विकी जाधव, कमलाकर जाधव, लोकेश यादव, गणेश मोरे, आदी सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






Be First to Comment