Press "Enter" to skip to content

रोजगार प्रश्नांवर महाराष्ट्र युवक काँग्रेस आक्रमक

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔷🔶

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे व जिल्हध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. तहसिलदार ता.उरण जि.रायगड यांना वाढत्या बेरोजगारी व वर्षांची २ कोटी नवे रोजगार या गंभीर प्रश्नांच्या बाबतीत निवेदन देण्यात आले.सद्या या कोरोना काळातील लॉकडाऊन मुळे अनेक लोकांचे रोजगार गेलेत व बेरोजगारीचे भीषण संकट सद्या उभे राहिले आहे.

या सर्व बाबींना गांभीर्याने घेऊन व युवकांच्या भविष्य लक्षात घेऊन तात्काळ रोजगार निर्मिती करावी व युवकांना न्याय द्यावा, अशीं मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेस चे चिटणीस श्री.निखिल नरेंद्र डवळे, उरण विधानसभा अध्यक्ष रोहित घरत , रायगड जिल्हा सरचिटणीस जितेश म्हात्रे, उरण विधानसभा सरचिटणीस विवेक म्हात्रे,उरण शहर अध्यक्ष अब्दूल शिलोत्री,चिटनीस अदित्य घरत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.