Press "Enter" to skip to content

नगरपंचायत आणि श्रमजीवी संघटनेत कलगीतुरा

श्रम आमचे आणि श्रेय भलतेच घेत आहेत : नगराध्यक्षा रेणूका पवार 🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार) 🔶🔷🔷🔶

नगरपंचायत खालापूर हद्दीत विकासकामावरून नगरपंचायत आणि श्रमजीवी संघटनेत कलगीतुरा सुरू झाला आहे.नगरपंचायत खालापूर हद्दीत आदिवासी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या प्रयत्नानी वाङीत विकासकामे होत असताना या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न श्रमजीवी संघटना करत आहे हे चुकिचे आहे असे मत नवनिर्वाचित नगराध्यक्षा रेणूका पवार यानी व्यक्त केले.

चार दिवसापूर्वी तहसील कार्यालयात तालुक्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नाबाबत श्रमजीवी संघटने सोबत तहसीलदार इरेश चप्पलवार यानी बैठक घेतली होती.तालुक्यातील आदिवासी आणि ठाकूर समजाची प्रलंबित कामे आणि मार्गी लागलेली कामाचा आढावा घेण्यात आला होता.खालापूर नगरपंचायत हद्दीतील वाङीवस्तीवरिल विकास कामे आणि रखङलेली  कामाचा उल्लेख श्रमजीवी संघटनेकङून बैठकित करण्यात आला होता. त्यामुळे नगरपंचायत खालापूर मधील वाङीचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक, नगरसेविका खवळून उठले आहेत.

अङीच वर्ष आदिवासी समाजाचा नगराध्यक्ष असून विकास कामे आमच्या माध्यमातून होत असताना श्रमजीवी संघटनेने श्रेय घेवू नये यावरून वाद वाढला आहे. 

सर्व कामे आम्ही मंजूर करून आणली.निधी उपलब्ध केला असे असताना श्रमजीवी संघटनेच काहि योगदान नाही.

रेणूका पवार
-नगराध्यक्षा खालापूर नगरपंचायत
संपूर्ण महाराष्ट्रभर आमची संघटनेच कार्य आहे.खालापूर आदिवासी ठाकूर समाजाचे विविध प्रश्नासाठी आम्ही रायगङ जिल्हाधिकारी याचे कङे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.आम्हाला दुस-याच श्रेय नको.

संजय गुरव
-सचिव श्रमजीवी संघटना रायगङ

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.