Press "Enter" to skip to content

मनसेच्या आंदोलनानंतरही पालथ्या घड्यावर पाणी : खालापूर आरोग्य केंद्र पाण्याविनाचं


सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)🔷🔶🔷🔶

आठवङ्यापूर्वी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरसुविधाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पंचायत समितीचे वरिष्ठ गटविकास अधिका-याना पञ देवून सुद्धा” हम नहि सुधरेंगे” यावर आरोग्य यंञणा ठाम असून आरोग्य केंद्रात शौचालय,बेसिनला  पाणी नसल्याने परिचारिका ,रूग्णांना ञास सहन करावा लागत आहे.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला बाहेरून फक्त रंगरंगोटी करण्यात आली असून आतमध्ये माञ सोयीसुविधांची बोंब आहे.मनसे तर्फे वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये यांना आरोग्य केंद्रातील विविध तक्रारीचे पञ देण्यात आले होते.परंतु आरोग्य केंद्रातील समस्या वाढतच आहे.गेल्या तीन महिन्यापासून आरोग्य केंद्रात दैनंदिन गरजेसाठी लागणार पाणी देखील नाहि.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात भूमिगत पाण्याची टाकी बांधण्यात आली असून त्याटाकीतून पाणी पंपाव्दारे आरोग्य केंद्रातील दोन टाकीत चढविले जाते.परंतु पंप नादुरूस्त झाल्यापासून आरोग्य केंद्रातील टाक्या कोरङ्या आहेत.

भूमिगत बांधण्यात आलेली टाकी रोज भरल्यानंतर ओसंङून वाहत आहे.दररोज हजारो लिटर पाणी आरोग्य केंद्रातून वाया जात असून शौचालय,बेसिनला पाणी नाहि.पाण्याचा दररोजचा अपव्यय ङोळ्यादेखत सुरू असताना वैद्यकिय अधिकारी माञ पंप दुरूस्तीला दिलाय अजून दुरूस्त झाला नाही अशी बेजबाबदार उत्तर देत आहेत.

खालापूर अद्याप पाणी पुरवठ्याबाबती स्वंयपूर्ण झालेल नसताना पाण्याचा रोजचा अपव्यय पाहून नागरिक संतप्त आहेत.

रूग्णाला उपचार केल्यानंतर हात धुवायला पाणी नसते.बाटलीतून भरून पाणी आणावे लागते अशी अङचण परिचारिकेनी सांगितली.प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला आरोग्य केंद्रात पाणी नाहि म्हणून दुसरीकङे जा असे देखील सांगण्यात आले होते.

दररोज आरोग्य केंद्रातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.मोठ्या प्रमाणात पाणी बसस्थानक परिसरात साचते.आरोग्य केंद्रात ठणठणाट आणि बाहेर पाण्याची नासाङी होत आहे.याबाबत तक्रार करून पण दुर्लक्ष होत आहे.

हेमलता चिंबुळकर
-महिला खालापूर तालुकाध्यक्षा-मनसे
भूमिगत टाकीला लागलेली गळती तपासण्यासाठी अभियंता याना तात्काळ पाठवू.तसेच अत्यावश्यक निधीतून नवीन पंप घ्या अशा सूचना वैद्यकित अधिकारी याना दिल्या आहेत.

भाऊसाहेब पोळ -सहाय्यक गटविकास अधिकारी खालापूर पंचायत समिती

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.