सिटी बेल लाइव्ह / वचन गायकवाड / तळोजा 🔶🔷🔷🔶
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दितील प्रभाग क्रमांक 1मधील तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या पेंधर गाव येथे 1972 पासूनचे जुने राहते घर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेत एका 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर इतर 3 जण जखमी झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तळोजा एम.आय.डी.सी ला लागून असलेल्या पेंधर येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील भूखंड क्रमांक 27 च्या शेजारी असलेले जुने राहते घर सकाळी 7 च्या सुमारास कोसळले. कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्या खाली काहि माणस अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केलं आहे. या बचावकार्या दरम्यान मुन्नार हरिजन याचा कुटूब राहत होतो. या कुटूबामध्ये पत्नीसह एक मुलगा व तीन मुली राहत होत्या.
या दुर्घटनेत हंसिका,अनपण आणि संतोष या तिघांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. ११ वर्षीय हिना हरिजन या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सदर या घटनेसंबंधी प्राथमिक स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास तळोजा पोलिस करीत आहेत.






Be First to Comment