सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार) 🔶🔷🔷🔶
अनंत चतुर्थी नंतर येणारा साखरचौथ गणेशोत्सव कोलाड विभागातील विविध गावांमध्ये सार्वजनिक तसेच घरगुती स्वरूपात साधेपणाने साजरा करण्यात आला.
कोरोना महामारीचा वाढत चाललेला प्रादुर्भाव पाहता यावेळी कुठेही कोणताही थाटमाट दिसण्यात आला नाही. तर ता.५ सप्टेंबर रोजी सकाळी साखरचौथ गणेशोत्सव अंतर्गत घरोघरी गणरायांचे आगमण झाल्यावर यथोचित पूजा आर्चा,महाआरती आदी कार्यक्रम संपन्न करण्यात आले. तर सायंकाळी हरिपाठ, जागर भजन तसेच महिला मंडळाचे मनोरंजनाचे कार्यक्रमही पार पाडण्यात आले.तर ता.६ सप्टेंबर रोजी प्रत्येकाने आपल्याला सोईचे होईल या पद्धतीने गणरायांचे सार्वजनिक तलाव, नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. वाढत चाललेल्या कोरोना महामारीचा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ याकरिता उत्सव तर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करण्यात आले.
विसर्जन प्रसंगी बाप्पा कोरोनाची महामारी लवकर संपून जाऊन पुर्वीचे दिवस लवकरच प्राप्त होऊ दे अशाप्रकारचे साकडे गणपती बाप्पाला घालण्यात आले.


Be First to Comment