Press "Enter" to skip to content

पेण कार्मेल हायस्कूलवर मनसेचे रुपेश पाटील पुन्हा धडकणार

15 तारखेची दिली अंतिम मुदत : अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

सिटी बेल लाइव्ह / पेण/ राजेश कांबळे / धम्मशिल सावंत 🔶🔷🔶🔷

रायगड जिल्ह्यातील पेण कार्मेल हायस्कूल आवारात शाळेमार्फत अथवा नियुक्त एजन्सीमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या टेक्सबुक ची किंमत छापील किमतीपेक्षा जास्त घेत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मनसेचे रुपेश पाटील यांनी सदर हायस्कूलला निवेदन दिले होते.
परंतु निवेदनाद्वारे विनंती करूनही शाळा व्यवस्थापन सकारात्मक भूमिकेत नसल्याचे दिसून आले आहे. बरेच दिवस होऊन सुद्धा यावर कोणताही निर्णय न मिळाल्याने रुपेश पाटील यांनी आपल्या सदस्यांसोबत पेण पंचायत समिती चे गटविकास अधिकारी चंद्रकांत पांडुंरग पाटील यांची भेट घेऊन सदर प्रकरणाचा उलगडा व्हावा यासाठी देखील निवेदन दिले.

तर येत्या 14 तारखेला कारमेल हायस्कूल चे शिष्टमंडळ आणि मनसेचे शिष्टमंडळ यांची मिटिंग लावू असे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले. मात्र ते देखील आश्वासनच राहिले. जर येत्या पंधरा तारखेपर्यंत निवेदनात नमूद केलेल्या मागणीची दखल घेतली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करून आम्ही मार्ग काढू असे मनविसे रा.जि. सचिव रुपेश पाटील यांनी सांगितले, त्या वेळी उपस्थित मनसे कार्य करते अमोल म्हात्रे मनविसे तालुका अध्यश,हनुमान नाईक विभाग अध्यक्ष,रुप पाटील कळवे,निलेश पाटील,दिपक पाटील,रोहित पाटील. अशोक ठाकुर हे होते.

शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेनी नियम पाळणे महत्त्वाचे आहे त्यामुळे या 14 तारखेला शाळा कमिटी मेंम्बर आणि मनसेचे पदाधिकारी यांची बैठक लावण्यात येऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल

सी.पी.पाटील ----- गटविकास अधिकारी पेण पंचायत समिती

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.