बहुउद्देशीय संघर्ष समिती हरेश्वर बागमांडलेच्या वतीने केली मिनीडोअर चालक मालकांकडे विनंती !🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन / रामचंद्र घोडमोडे 🔶🔷🔶🔷
श्रीवर्धन तालुक्याची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणाऱ्या मिनिडोर वाहतुकीला सध्या नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहें .कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या सुरवाती पासून मिनिडोर प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात आली होतीं. त्यामुळे चालक व मालक यांच्या जीवन मरणाचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. शासना तर्फे कोणतीही आर्थिक मदत न करता केवळ कागद पत्रांची मुदत वाढविण्याचे सहकार्य केले.
संघटने तर्फे वाहतूक चालू करण्यासाठी शासन दरबारी निवेदन देन्यात आले होते. श्रीवर्धन हरेश्वर बागमांडले बोर्लि येथिल नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होतें. मिनिडोर प्रवाशी वाहतूक चालू झाल्या नंतर सोशल डीस्ट्नशिंग चे नियम पाळत भाडे आकारण्यात येत होतें. त्याला नागरिकांनी हि सहकार्य केले होते.
काहीच दिवसात सोशल डीस्ट्न शिंग न राखता दहा प्रवाशी बसवण्यास सुरवात झाली. व भांडे 60 रुपये ठेवण्यात आले हे भाडे 20 k.m साठी प्रवाशांना न परवडणारे आहें यावर कोणीही बोलण्यास तयार होत नव्हते. ही बाब बहुउद्देशीय संघर्ष समिती हरेश्वर बागमांडले चे अध्यक्ष सुनील खळे यांच्या निदर्शनाला आल्या नंतर आपले सहकारी उपाध्यक्ष परेश कोलथरकर. सचिव दिपक देवकर .सल्लागार रत्नाकर लांबाडे यांचे मार्गदर्शन घेत मिनिडोर चालक मालक संघटना अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील नागरीकांची होणारी लूट थांबविन्याचे सुचविले .होणारी लूट न थांबविल्यास बहुउद्देशीय संघर्ष समिती हरेश्वर बागमांडले आंदोलन करेल असा इशारा आमच्या प्रतिनिधिशी बोलताना करण्यात आला.






Be First to Comment