Press "Enter" to skip to content

पेण मध्ये भरमसाट वीज बिला विरोधात भाजपचे ठिय्या आंदोलन

मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पेण ( प्रतिनिधी )🔷🔶🔶🔷

भाजपच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणच्या कार्यालयावर भरमसाट येणाऱ्या वीज बिला विरोधात ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले होते त्याच अनुषंगाने पेण येथील भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन केले असता यावेळी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा बोजबारा उडाला असल्याचे पाहावयास मिळाले.

कोरोनाच्या लाॅकडाऊन मुळे संपुर्ण जनता हैराण झाली आहे त्यातच भरमसाट येणाऱ्या वीज बिलामुळे नागरीकांची झोप उडाली आहे त्यामुळे ही आलेली वाढिव वीज बिले तात्काळ रद्द करावीत अथवा कमी करण्यात यावीत या मागणीसाठी पेण तालुका भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येऊन यावेळी उपस्थितांनी वीज बिलांची होळी केली.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिप माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, सरचिटणीस बंडू खंडागळे, पेण तालुकाध्यक्ष श्रिकांत पाटील, अजय क्षिरसागर,मिलिंद पाटील, भरत साळवी यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

( सदर वीज बिल ही मागच्या लाॅकडाऊनच्या अगोदरची एवरेज बिल आहेत आणि ती रिडींग प्रमाणे असून जर एखाद्या ग्राहकाची तक्रार असल्यास त्याचे निवारण करण्यात येऊन येत्या काही दिवसांत गांवागांवामध्ये वीज बिल महामेळावा भरविण्यात येणार असुन नागरीकांच्या तक्रारीचे निवारण तिथेच करुन वीज बिल ही भरण्यात येतील तेव्हा नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
दिपक पाटील — अधिक्षक अभियंता )

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.