भारतीय बौद्ध महासभेच्या धम्म कार्याने झाले प्रेरीत : चंद्रकांत सोनावणे यांनी केले प्रवेश कर्त्यांचे स्वागत
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔶🔷
दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया ( भारतीय बौद्ध महासभा ) संस्थापक: डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,राष्ट्रिय अध्यक्षा:आद.मिराताई आंबेडकर , राष्ट्रिय कार्याध्यक्ष आद.भिमरावआंबेडकर , तसेच तालुका शाखा पेणचे अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली पेण तालुक्यांत वर्षावास प्रवचन मालिका अखंडपणे सुरू आहे. अशातच भारतीय बौद्ध महासभेच्या धम्म कार्याने प्रेरीत होऊन कुरनाड मधील २५ ग्रामस्थांनी भारतीय बौद्ध महासभेत रविवार दि.(6) रोजी जाहिर प्रवेश केला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने चंद्रकांत सोनावणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले. आंबेडकरी व धम्म चळवळ तळागळात अधिक व्यापज स्वरूपात पोहचविण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तनमनधनाने योगदान देणार असल्याची ग्वाही याप्रसंगी प्रवेशकर्त्यांनी दिली.

कुरनाड येथे वर्षावासाचे सलग तेरावे पुष्प मंगलमय व उत्साही वातावरणात संपन्न झाले. प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी श्रामणेर विठोबा गायकवाड व पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे यांनी बहुजन महापुरुषांच्या आदर्श प्रतीमांचे पुजन केले. यावेळी जिल्हा संघटक व जेष्ट प्रवचनकार मारुती शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले तर संस्कार उपाध्यक्ष मनोज शिंदे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देउन स्वागत केले. या प्रसंगी जेष्ठ बौद्धाचार्य व प्रवचनकार मारुती शिंदे यांनी,त्रिशरण, पंचशिला,बुद्ध वंदना,घेउन कार्यक्रमाची सुरुवात केली. अनित्य,अनात्मा,व दु:ख या विषयावर खुप असे अभ्यास पुर्ण मार्गदर्शन करून वर्षा वासाचे महत्व पटवून दिले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना चंद्रकांत सोनावणे म्हणाले की तथागतांचा धम्म हा प्रत्येकाच्या घराघरात पोहचवीणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आपण पाहिलेले नाही.परंतु त्यांच्या कुटुंबा बरोबर व त्यांच्या कार्य प्रणालीत आपल्याला धम्म कार्यकरण्याची संधी मिळालीआहे. या धम्म कार्याच्या माध्यमातुन आंबेडकर कुटुंबाच्या पाठी खंबीरपणे उभे राहणे ही तुमची आमची मुख्य जबाबदारी व कर्तव्ये आहे. असे आवाहन सोनावणे यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे व त्यांच्या कार्यकारणी मार्फत सातत्याने सुरु असलेल्या धम्म कार्यावर पेरीत होउन कुरनाड येथील माजी श्रामणेर विठोबा गायकवाड ,मधुकर पवार, वनिता रघुनाथ ओव्हाळ,सिमा राजु कांबळे, महेंद्र वि.गायकवाड, अनिता महेंद्र गायकवाड, अनिकेत म.गायकवाड, पुजा म.गायकवाड, मनिष म.गायकवाड, शुभांगी आदेश गायकवाड, अदीत्य मु.गायकवाड, विकी विकास गायकवाड, आदेश मु.गायकवाड, यशोदा वि.गायकवाड, ऱाकेश विलास गायकवाड , मनिषा मधुकर पवार, प्रविण म.पवार, ऱाणी मधुकर पवार, ऱघुनाथ महादेव ओव्हाळ, स्वप्निल रघुनाथ ओव्हाळ,केतकी स्वप्निल ओव्हाळ, दिपेश रघुनाथ ओव्हाळ, प्रियांका दिपेशओव्हाळ, सिमा राजु कांबळे, अतुल राजु कांबळे यांनी भारतीय बौद्ध महासभेत जाहिर प्रवेश केला. यावेळी अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे, सरचिटणीस, सचिन कांबळे कोषाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी शाल गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देउन सर्वांचे स्वागत केले. यावेळी सरचिटणीस सचिन कांबळे, जिल्हा संघटक मारुती शिंदे, उपाध्यक्ष मनोज शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रभाकर शिंदे, तसेच उंबर्डे गावचे जेष्ट कार्यकर्ते भास्कर कांबळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे कुरनाड ग्रामस्थांनी यशस्वी व नीटनेटके नियोजन केले होते. या प्रसंगी पाबळ ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या माधुरीताई शिंदे, ललिताताई शिंदे, सुलोचनाताई शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्त्या सुमन ताई गायकवाड, हरिभाउ शिंदे यांच्या सह गावातील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते. शेवटी सरणतय घेउन कार्यक्रमाची समाप्ती झाली.






Be First to Comment