Press "Enter" to skip to content

महावितरण कार्यालयावर भाजपा श्रीवर्धन तालुका वतीने निषेध मोर्चा

श्रीवर्धन तालुक्यातील वाढीव वीजबिलां विरोधात एल्गार !

सिटी बेल लाइव्ह / (श्रीवर्धन रामचंद्र घोडमोडे) 🔷🔶🔷🔶

राज्यात गेले पाच ते सहा महिने लॉकडाऊन संचारबंदी मूळे जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत़. सर्व जनतेला घरीच बसावं लागले आहे. हातचे लहान मोठे रोजगार बंद झाले आहेत़. दोन वेळचे जेवण मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यात आजारपण कसेबसे सावरत असतांना तालुक्यात झालेलल्या चक्री वादाळामुळे अतोनात नुकसान झाले होते .त्यात महावितरण कंपनी कडून जादा रक्कमेचे बिल वाटप करण्यात आले आहे.

काही नागरिकांनी आपले दागिने गहाण ठेऊन लाईट बिल भरली आहेत़ तर काही भरू शकले नाही. राज्य सरकारने वीज बिल माफ करण्याबाबत जाहीर केले होते. परंतु बिल माफ न करता देण्यात आलेली लाईट बिल हि वाढवून दिलेली आहेत. असे नागरिकांचे म्हणणे आहे. भरमसाठ आलेल्या वीजबिल घेऊन नागरिक महावितरण कार्यालयात चौकशी साठी जात आहेत पण तिथे नागरिकांना समाधानकारक उत्तर मिळत नाही व बिल भरावेच लागणार असे महावितरण कर्मचाऱ्यान कडून सांगितले जात आहे.

नागरिकांना होणारा नाहक त्रास पाहून माजी पंचायत समिती सभापती तसेंच श्रीवर्धन भाजपा तालूका अध्यक्ष प्रशांत शिंदे, तालुका सरचिटणीस आशुतोष पाटील, शहर अध्यक्ष शैलेश खापनकर, मनोज जाधव, दिनेश पाटिल, भरत जाधव, अन्वर उड्रे. गणेश मांजरेकर.तसेच प्रमूख कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत महावितरण कार्यालयावर वीज बिल माफ व वाढीव बीलाबाबत मोर्चा काढण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.