
महाराष्ट्रातील पहिल्या मंदिराचे टाळे तोडून पनवेल मनसेने महाआरती करून भाविकांसाठी केले खुले 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पनवेल 🔷🔶🔷🔶
सरकारच्या अतार्किक निर्णया विरोधात तुम्ही मंदिर खुली करणार नसाल तर राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही ती लोकांसाठी खुली करू असा पवित्रा घेत पनवेल मनसे तर्फे पनवेल मधील विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून महाआरतीचे नियोजन करण्यात आले.
सरकारच्या बेगडी पुरोगामित्वासाठी यापुढे भक्तांची आणि देवाची ताटातुट महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. ज्या प्रमाणे समुद्र मंथनावेळी महादेवाने विष प्राशन करून सृष्टीला प्रलयापासून वाचवले होते त्याच प्रमाणे कोरोनाच्या संकटातून देशाला वाचवण्यासाठी महादेवांना साकडे घालण्यात आले.
त्यावेळी पनवेल मनसेचे अतुल चव्हाण, योगेश चिले, अविनाश पडवळ, यतिन देशमुख, पराग बालड, रोहित दुधवडकर, अमोल बोचरे, राहुल चव्हाण, निर्दोष गोंधळी, राहुल पाटील, अमोल पाटील, प्रसाद परब, कैलास माळी, आकाश देशमुख, संजय मुरकुटे, प्रकाश लाड, विजय पवार, रोशन पाटील, अनिकेत मोहिते, सचिन जाधव, हे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






Be First to Comment