Press "Enter" to skip to content

रोहे ग्रामीण भागात साखरचौथ गणेशोत्सव सोहळा संपन्न


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे ( नंदकुमार मरवडे) 🔶🔷🔶🔷


दहा दिवसांचा गणेशोत्सवाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर साखर चतुर्थीच्या दिवशी स्थापना करण्यात आलेल्या साखरचौथ गणेशोत्सवाचा सोहळा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने व भक्तीमय वातावरणात संपन्न करून रोहे तालुक्यातील ग्रामीण भागात गणरायाचे मोठ्या श्रद्धा पूर्वक विसर्जन करण्यात आले.
       

साखरचौथ गणेशोत्सवातंर्गत साखर चतुर्थीच्या दिवशी सकाळी गणेशाचे वाजत गाजत आगमनानंतर मोठ्या भक्तीमय वातावरणात विधिवत पूजा करून विविध धार्मिक तथा अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावर्षीही तालुक्यातील विविध गावात अनेक वर्षापासून घरगुती व सार्वजनिक स्वरूपात हा उत्सव साजरा करण्यात येत आला.त्या अनुषंगाने साखरचौथ व दुस-या दिवशी गावागावात व घरोघरी मंगलमय व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
        

दीड दिवसांच्या या उत्सव प्रसंगी गणरायांचे आगमन झाल्यानंतर महाआरती, हरिपाठ, जागर भजन, महाप्रसाद आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.तर विसर्जन प्रसंगी
अतिशय शांततेत व शासकीय नियमानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.तर उत्साही वातावरणात सार्वजनिक तलाव व नदीपात्रात या गणेशाचे भक्तीने व श्रद्धापूर्वक विसर्जन करण्यात आले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.