Press "Enter" to skip to content

समाजसेवक के.पी.पवार यांच्या निधनाने रायगडचा आदिवासी समाज पोरका

निधनाने सर्वत्र शोककळा 🔶🔷🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्र्वास निकम) 🔶🔷🔷🔶

माझा आदिवासी समाज शिकला पाहिजे माझा आदिवासी समाज एकजूट झाला पाहिजे,यासाठी शेवटच्या श्वासाबरोबर काम करणार अशी जणू शपथ घेतलेले व संपूर्ण रायगड जिल्ह्याला प्रत्येक आदिवासी वाडीतील प्रत्येक आदिवासी बांधवांना ओळखीचे असणारे के पी पवार उर्फ ह.भ प.किसन पांडुरंग पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने कांदळगाव निजामपूर येथे निधन झाले.

के पी पवार हे कांदळगाव येथील वीज खात्यामध्ये नोकरीला होते म्हणून निवृत्तीसाठी दोनच महिने बाकी होती ती नेहमी म्हणायचे मी सेवानिवृत्त झालो की समाजाचे पूर्णवेळ काम करेन माझा समाजातील प्रत्येक समाजातील मुले मला आय एस आय , तहसीलदार पी एस आय, मला पाहायचे आहेत त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायची माझी तयारी आहे त्यांनअसे ते म्हणायचे लोक एकत्र यावे म्हणून माणगाव तालुका आदिवासी समाज संस्थेची स्थापना करून त्यामध्ये सेक्रेटरी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम पाहिले संपूर्ण माणगाव तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज एकसंघ केले माणगाव वनवासी कल्याण आश्रम शाळेसाठी सर्वात मोठे योगदान त्यांचे आहे.त्यांनी कधीच सुट्टीचा वार आपल्या कुटुंबासोबत साजरा न करता सुट्टीचा वार हा समाजासाठी दिला.

ते रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रसिद्ध होते समाजातिला भांडण तंटे अचूक सोडवायचे पवार हे सर्व न्याय-निवाडा अचूक सोडवायचे, रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजावर कोठेहीअन्याय झाला तर के पी पवार मदतीला प्रथम धाऊन जायचे, आदिवासींसाठी समाजासाठी ते देवदूतच होते, वारकरी संप्रदायाची पायी दिंडी असेल सप्ताह असेल तर कोणतेही कोणतेही तालुक्यात क्रिकेट कबड्डी , सामने असतील तर के पी पवार नाही असे कधी झाले नाही ते उत्तम खेळाडू होते टेबल टेनिस धावणे, फुटबॉल क्रिकेट या खेळात यांची यांनी वीज मंडळाच्या खात्यातूनअनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्याने ऑलिम्पिकपर्यंत खेळात मजल मारलेली आहे.

के पी पवार यांच्या निधनाने माझा पत्रकारितेतील गुरु हरपला असे वक्तव्य पत्रकार भिवा पवार यांनी केले.तर माझे राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शकास मी मुकलो असे विधान रायगड जिल्हा परिषद सदस्य दयाराम पवार यांनी केले.तसेच सामाजिक क्षेत्रातील व आदिवासी समाजातील कोहिनूर हिरा आम्ही गमावला असे विधान बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश कातकरी यांनी केले, तर शिक्षण क्षेत्रातील खऱ्या मार्गदर्शकास आम्ही मुकलो विधान वनवासी कल्याण आश्रम माणगाव शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी केले तर माझे मार्गदर्शक व सामाजिक क्षेत्रातील महामेरू आज हरपला असे विधान पनवेलचे सामाजिक कार्यकर्ते एकनाथ वाघे गुरुजी यांनी केले.

माणगावच्या वनवासी कल्याण आश्रम शाळा उतेखोल या शाळेच्या विकासात व प्रगतीत जडणघडणीत भरभराटीत के पी पवार यांचे खूप मोठे योगदान आहे, आदिवासी समाजाचे काम करताना त्यांनी कधीच कोणत्याच पदाची अपेक्षा केली नाही,त्यांचे दस क्रिया विधि रविवार दि.१३/९/२०२० रोजी तर उत्तरकार्य विधी बुधवार दि.१६/९/२०२० रोजी वावंढळ तालुका खालापुर येथे त्यांच्या निवासस्थानी होणार आहेत ,चांगल्या निस्वार्थी समाजसेवकास आपण मुकलो अशी प्रतिक्रिया आदिवासीं समाजात व जनमानसात उमटू लागले असून आदिवासी समाजाचा आधार गेल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे,

ह.भ.प. के पी पवार यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ असा परिवार आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.