सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶
तालुक्यात शैक्षणिक क्षेञात कार्य करताना पिढी घङविण्याचे कार्य करणा-या शिक्षकांचा दिलासा फाउंडेशन गुरुजन गुण गौरव पुरस्काराने दरवर्षी सन्मान करत असून यंदा शिक्षक दिनाला तालुक्यातून 17 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवङ करण्यात आली आहे.
दिलासा फाऊंङेशन खालापूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित असते.मुलीना स्वंसरक्षणाचे धङे,रस्ते सुरक्षा अभियान,वैद्यकिय शिबिर, वृक्षारोपण मोहिम उपक्रम असे उपक्रमाशिवाय शैक्षणिक क्षेञात परिघाबाहेर जात विद्यार्थी आणि शाळेचे नावलौकिकात भर घालणा-या शिक्षकांचा गौरव केला जातो .

यंदा दिलासा फाऊंङेशन गुरूजन गौरव पुरस्काराचे चौथे वर्ष आहे.यंदा गुरूजन गुणगौरव पुरस्कारासाठी तालुक्यातून किर्ती किरण धारणे(सांगङे, देवन्हावे) करूणा अरुण बोंबे (खरसूंडी सावरोली), संदीप रत्नाकर जाधव (कलोते रयती ) ,मोहन कुंडलीक कापरे (नावंडे वाडी जांबरूग) ,मनिषा रविंद्र पाटील( पौद वाङी माजगाव), राजेश देवराम बावीस्कर (वावंढळ चौक), शैला अप्पासाहेब पवार(कोपरी सारंग ), दीप्ती दत्ताराम यादव (वावरले), शुभांगी शशिकांत भंडारकर ( कांबे मोहोपाडा), संतोष महादेव निघोट (डोनवत ठाकूर वाङी नारंगी) , वर्षा बबन थोरात (सारसन आत्करगाव ) , हणमंत किसन गाडे (तांबाटी वाडी देवन्हावे ),सुभाष महादू झावरे(बोरीमाळ,कारगाव)मिनाक्षी हिराजी पाटील( शिरवली वावोशी ), साधना संतोष साळुंखे ( “न पा क्र ३ “न पा खोपोली) ,सुरेश गवारी(स्वामी विवेकानंद विद्यामंदिर खालापूर)नंदा गेनबा मोहिते (केंद्र प्रमुख सावरोली ) निवङ करण्यात आली आहे.






Be First to Comment