Press "Enter" to skip to content

केअर पॉईंट हॉस्पिटल, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात होणार टेस्ट

उरण तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांची कोविड अँटीजन टेस्ट करण्याचे आदेश 🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶

देशात व राज्यात कोरोना कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. यामुळे उरण तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य व कर्मचारी वर्ग यांची अँटीजन टेस्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी सदर टेस्ट ही केअर पॉईंट हॉस्पिटल बोकडविरा व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ या दरम्यान करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून ही टेस्ट करून घ्यावी असे उरण गटविकास अधिकारी यांनी सांगितले.

सदर तपासणी कार्यक्रम पुढीलप्रमाणे सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी केअर पॉईंट हॉस्पिटल बोकडविरा येथे पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, आवरे व बांधपाडा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य सदस्य, मंगळवार दि. ८ सप्टेंबर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे चाणजे, केगाव, नागाव व म्हातवली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य सदस्य, तर केअर पॉईंट बोकडविरा येथे फुंडे, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, नवघर, भेंडखळ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य सदस्य, बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय बोकडविरा, डोंगरी, पाणजे, घारापुरी, जसखार ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य सदस्य, तर केअर पॉईंट हॉस्पिटल बोकडविरा येथे चिरले, वेश्वि, धुतुम, दिघोडे, विंधणे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य सदस्य, गुरुवार दि. १० सप्टेंबर रोजी केअर पॉईंट बोकडविरा येथे रानसई, चिरनेर, जुई, कळंबुसरे, कोप्रोली, तर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय पागोटे, करळ, सोनारी, जासई ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य सदस्य, शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी केअर पॉईंट बोकडविरा येथे गोवठणे, आवरे, पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन, कोप्रोली, कळंबुसरे, जुई, चिरनेरचे ग्रामपंचायत कर्मचारी, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली, फुंडे, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, नवघर, भेंडखळ, बोकडविरा, डोंगरीचे ग्रामपंचायत कर्मचारी, शनिवार दि. १२ सप्टेंबर रोजी इंदिरा ग्रामीण रुग्णालयात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तर केअर पॉईंट बोकडविरा येथे चाणजे, घारापुरी, जसखार, पागोटे, करळ, सोनारी, रानसई, विंधणे, धुतुम, वेश्वि, चिरले, जासईचे ग्रामपंचायत कर्मचारी यादिवशी सदर ठिकाणी टेस्ट करावयाचे आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.