आंतरराष्ट्रीय रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. भरत वाटवणी संचालित श्रद्धा फाऊंडेशनच्या वतीने धान्य वाटप 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔷🔶🔶🔷
आंतरराष्ट्रीय रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. भरत वाटवणी संचालित श्रद्धा फाऊंडेशनच्या वतीने आदिवासी वाडीत सुमारे 3 हजार 500लोकांना धान्य वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गोरगरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, सामजिक संस्था पुढे येत आहेत. कर्जत तालुक्यात अनेक कुटुंबांना या संकट काळात त्यांनी मदतीचा हात दिल्याने मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणार्या आदिवासींना मोठा दिलासा मिळत आहे. अंतरराष्ट्रीय रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. भरत वाटवणी संचालित श्रद्धा फाऊंडेशनच्या वतीने कर्जत तालुक्यातील तुंगी, खडकवाडी, माथेरान, पाथरज, धोत्रेवाडी, कोदींवडे,उमरोलीबीड, वेणगाव, किरवली पळसदरी आदिवासी वाडीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मुबंई बोरिवली येथे राहणारे डॉ. भरत वाटववी यांनी 2006 पासून कर्जत मधील वेणगाव येथे श्रद्धा फाऊंडेशन स्थापन करून मनोरुग्णांची सेवा सुरू केली. रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण उचलून त्यांनी आपल्या श्रद्धा फाऊंडेशन येथे आणून त्यांच्यावर उपचार सुरू करतात.आतापर्यत 7 हजार रुग्ण त्यांनी बरे करून घरी पाठवले आहेत.या समाजसेवा बरोबर त्याची कर्जत तालुक्याशी वेगळे नाते जमले आहे, लॉक डाऊन काळात तालुक्यातील आदिवासी, विधवा, अपंग, वृद्ध यांना मदतीचा हात म्हणून त्यांनी जीवनाश्यक वस्तू भरलेले 35 किलोचे किट तालुक्यातील विविध गावात वाटले.

डॉ. भरत वाटवणी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा फाऊंडेशन टीमचे स्थानिक सदस्य रमेश मुंढे, ध्रुव बडेकर, सचिन म्हसे, एस. जी. बसवराज, शहनीर अख्तर, नितेश शर्मा, शैलेश शर्मा आदीं वाटपाचे काम करत आहेत.






Be First to Comment